हिवाळी अधिवेशनात ‘हलाल प्रमाणपत्र रद्द करा, आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधी पोलीस पथकाची स्थापना करा !
हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाला आग्रह !
बेळगावी : राज्यात वाढणाऱ्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या नमुन्यानुसार लव्ह जिहाद’ विरोधीविशेष पोलीस पथकाची स्थापना करावी आणि ‘हलाल प्रमाणपत्र’ रद्द करावे, अशी मागणी करून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुवर्ण विधान सौधच्या समोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर हे बोलताना म्हणाले की, देहलीचा जिहादी आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे ३५ तुकडे केले. असेच संपूर्ण राज्यात देखील ‘लव्ह जिहाद’ घडत आहे. राज्यातधर्मांतर विरोधी कायदा असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतर वाढले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन ‘लव्ह जिहाद’च्या घटना रायचूर येथे घडल्या आहेत. पालकांनी तक्रार दाखल करून देखील धर्मांतर करणाऱ्या धर्मांध अपराध्याला अटक केली नाही. धर्मातराच्या प्रकरणाखाली नोंद करण्यात आली नाही. ६ मासांपूर्वी कोडग येथील दीप्ती ही दंतवैद्य विद्यार्थिनी ‘लव्ह जिहाद’मुळे इस्लाम धर्मात धर्मातरीत झाली. नंतर तिला आयसीसच्या आतंकवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर एन्. आय. ए. ने अटक केली. मंगळुरुची आशा ही आयेशा बानु म्हणून धर्मांतरीत झाली. तिला इंडियन मुजाहिदीन आतंकवादी प्रकरणात पोलिसांनी अटक केली. राज्यातील मंगळुरू, बंगळुरू, उडुपी, शिवमोग्गा, कोडगु येथील ‘शाहीन महाविद्यालयात येणाऱ्या हिंदू युवतींचा मुसलमान युवतींशी परिचय करून देऊन ‘लव्ह जिहाद’ला कुमक देत आहेत. २०१४ ते २०१९पर्यंत राज्यात २१,००० युवती बेपत्ता झाल्या आहेत. अनेक मौलवी,
मदरसे धर्मातराचे कार्य करत आहेत. हे थांबविण्यासाठी उत्तरप्रदेशाच्या नमुन्यानुसार विशेष ‘लव्ह जिहाद’ विरोधी पोलीसदलाची स्थापना करावी, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
त्याचप्रमाणे राज्यात अनधिकृतपणे धर्माच्या आधारावर हलाल लोगो असलेले प्रमाणपत्र जनसामान्य वापरत असलेल्या उत्पादनांवर छापून सहस्रो कोटी रुपयेसंग्रहीत करून धर्माध संघटनात्याचा देशविरोधी कारवायांसाठी उपयोग करत आहेत. केंद्र शासनाची FSSAI ही प्रमाणपत्र देणारी संस्था असून देखील धर्माच्या आधारावर ‘हलाल प्रमाणपत्र देणे हे संविधानाच्या विरोधी आहे. ते त्वरीत रद्द करावे. हलाल प्रमाणपत्रातून मिळणारा पैसा देशद्रोही कारवायांसाठी वापरला जात आहे, या विषयी चौकशी करण्यात यावी. याच्याशी संबंधित असा ‘हलाल प्रमाणपत्र रद्द करणारा कायदा या हिवाळी अधिवेशनात पारित करावा, असे त्यांनी ठासून सांगितले,