उद्या मोठ्या प्रमाणात छेडणार आंदोलन
बेळगांव :अंतर्गत आरक्षणाच्या अंमलबजावणीला कोराच, चकोरवा, भजंत्री, भोवी (वडदरा), लांबणी, डोंबर समाज उद्या आंदोलन करणार आहेत.या सर्वांचे बेळगाव चलो आंदोलन सुरू झाले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक यात सामील होणार असल्याचे संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग पम्मार यांनी सांगितले.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव चलो आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यातून कोराचा, कोरवा, भजंत्री, भोवी (वडदरा), बंजारा (लांबणी) डोंबर समाजातील लाखो लोक सहभागी होणार आहेत. हा संघर्ष बेळगाव कन्नड साहित्य भवन येथे होणार असून तेथून विधानसभेत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या संघर्षात भोवी वड्डारा समाजाचे गुरु, लांबणी समाजाचे परमपूज्य, कर्नाटक आरक्षण संरक्षण संघ संघर्ष समितीचे सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली
त्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन मंत्री व अंतर्गत आरक्षण उपसमितीचे सदस्य प्रभू चव्हाण यांची भेट घेऊन सरकारने घाईघाईने मंत्रिमंडळात निर्णय घेऊन अंतर्गत आरक्षणासाठी उपसमिती स्थापन केले असल्याचे सांगितले