समितीच्या वतीने “चलो कोल्हापूरची” हाक
महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज मराठा मंदिर येथे बोलविण्यात आली होती यावेळी या बैठकीत कर्नाटक प्रशासनाने केलेल्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर प्रति महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र या ठिकाणी महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली.
त्यामुळे या महामेळाव्याच्या दडपशाहीचा निषेध करण्याकरिता आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या अधिवेशन काळात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे .आणि चलो कोल्हापूरचा नारा दिला आहे
सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता येथील एसपीएम रोड वरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देऊन कोल्हापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे.
त्यामुळे सर्व मराठा बांधव बेळगाव ते कोल्हापूर अशी बाईक रॅली काढणार आहे तसेच या ठिकाणी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने सीमावास यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवून सीमा भागातील नागरिकांच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर येथे करणार आहे.
https://fb.watch/hyNiGzCaAU/
आज झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोहर किनेकर मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे विकास कलघटगी रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह समिती चे कार्यकर्त्यांनी सदस्य उपस्थित होते.