सीमवासीयांसाठी कोण घेणार कृष्णावतार …..???
24 एप्रिल 2022 रोजी उदगीर येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात बोललो होतो त्याची खरी प्रचिती आत्ता येतेय. कर्नाटकी कौरव सिमवासीयांच वस्त्रहरण करत असताना केंद्राने धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे पण महाराष्ट्र ही पांडवांच्या भूमिकेत गप्प? म्हणून आता प्रश्न पडतोय की सिमवासीयांसाठी आता कृष्णावतार कोण घेणार. कर्नाटक सरकारच्या मराठी आणि महाराष्ट्र द्वेषापुढे महाराष्ट्राची अस्मिता फिकी पडतेय? महाराष्ट्र सरकारने आता ठोस भूमिका घ्यावी नाहीतर आम्हास सांगावं की तुम्ही तुमचं बघा आणि असही आम्ही ही एकाकी झुंज किती दिवस देणार,
छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानून त्यांच्या विचारांनी चालणारा महाराष्ट्र आज स्वराज्य राखण्यात असमर्थ ठरतोय का?
हे सगळं आता सहन होत नाही
जय शिवराय
जय महाराष्ट्र