विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी छेडले आंदोलन
पदवी परीक्षांचे निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठांचा निषेध करण्याकरिता आज नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया चा नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले. यावेळी चन्नमा सर्कल येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केले.
गेल्या आठ महिन्यांपूर्वी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठांचा निषेध यावेळी विद्यार्थ्यांनी केला तसेच चन्नमा सर्कल येथे सर्व विद्यार्थी ठाण मांडून आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले.
यावेळी राज्यात सह बेळगावात देखील सर्व विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालय बंद ठेवून निषेध करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर न करणाऱ्या विद्यापीठांचा निषेध केलाच त्याशिवाय एन ए पी अभ्यासक्रम रद्द करा व शिष्यवृत्ती वसतिगृह बस सेवा पास अन्य शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केली.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी चन्नम्मा सर्कल येथे विद्यापीठांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली त्यानंतर निवेदन सादर केले यावेळी विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या आंदोलनात सहभागी झाले होते.