22 सावे मराठी बाल साहित्य संमेलन उत्साहात पार
येथील रंग मंदिर मध्ये गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी आयोजित 22सावे मराठी बाल साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.
यावेळी सदर कार्यक्रमात मध्ये मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोथापल्ली ज्येष्ठ मराठी सिने अभिनेते विक्रम गोखले लावणीसम्राज्ञ सुलोचना चव्हाण प्रबोधिनी सदस्य चिमणराव जाधव दौलत राजमाने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुशल गोरल आणि अथर्व गुरव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी पहिले सत्र कथाकथनचे पार पडले त्यानंतर दुसऱ्या सत्रात शांता झाली यांनी काव्यगायन केले. तर तिसरे सत्र कवी संमेलन चौथी सत्र अध्यक्ष भाषण आणि त्यानंतर बक्षीस समारंभ पार पडला.
यावेळी प्रास्ताविक सौम्या पाखरे यांनी केले तर आभार इंग्रजीत मोरे आणि सूत्रसंचालन शितलताई बडबंजे यांनी केले.