अखिल भारतीय NCC ट्रेकिंग मोहीम
अखिल भारतीय NCC ट्रेकिंग मोहीम “बेळगाव ट्रेक – 2022” NCC ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे . NCC संचालनालय कर्नाटक आणि गोवा यांच्या अंतर्गत 15 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 या कालावधीत हा ncc बेळगाव ट्रेक पार पडणार आहे .
कर्नल के श्रीनिवास, NCC ग्रुप कमांडर हे या शिबिराचे उद्घाटन करून कॅडेट्सना मार्गदशन करणार आहेत .या पहिल्या ट्रेकसाठी शिबिराचा शुभारंभ 16 डिसेंबर रोजी करण्यात आला.
या ट्रेक मध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि पाँडेचेरी, केरळ आणि लक्षद्वीप, गुजरात, कर्नाटक आणि गोवा यांसह 07 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 5 NCC संचालनालयातील 510 कॅडेट्स आणि 15 सहयोगी NCC अधिकारी या ट्रेकिंग मोहिमेत सहभागी झाले आहेत.
तसेच त्यांना बसुर्ते, बेळगुंदी , देवरवाडी, हंगरगा आणि महिपालगड भागात ट्रेक केला जाणार आहे . शैक्षणिक दौऱ्याचा एक भाग म्हणून कॅडेट्स कमांडो विंग, एमएलआयआरसी सेंटर आणि राजहंसगड येल्लूर किल्ल्यालाही भेट देणार आहेत . या शिबिराची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे . ज्यामध्ये सर्व संचालनालयातील कॅडेट्स सहभागी होणार आहेत .
राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे, साहसाची भावना निर्माण करणे, सहनशक्ती, सांघिक भावना विकसित करणे आणि पर्यावरणीय समतोल आणि प्राचीन वास्तूंची चिंता विकसित करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे.