वकील संरक्षण कायदा लागू करा
बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी 19 डिसेंबर 2022 पासून सुरू होणार्या विधानसभेच्या अधिवेशनात वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या मागणीचे नेवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना सादर केले आहे .
प्रारंभी बार असोसिएशनच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे कोर्टाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून रस्ता रोको करून आंदोलन केले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की अलिकडच्या काही दिवसांत वकिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि त्यांपैकी अनेकांना त्यांची व्यावसायिक कर्तव्ये पार पाडताना मारले गेले आहे, या वस्तुस्थितीची चांगली जाणीव आपणाला आहे.
त्यामुळे अॅडव्होकेट्स असोसिएशन, बेळगाव आणि कर्नाटकच्या इतर अॅडव्होकेट्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना 19 डिसेंबर 2022 पासून येणार्या अधिवेशनात विधानसभा आणि कौन्सिलसमोर ठेवून वकील संरक्षण विधेयक मंजूर करावे अशी विनंती केली आहे .
त्याचबरोबर वकिलांच्या सुरक्षेसाठी उक्त संरक्षण तरतूद वकील संरक्षण कायदा, 2022 द्वारे कायदा बनवल्यास कर्नाटकातील संपूर्ण अधिवक्ता समुदाय आपले आभार मानेल. जनतेच्या हितासाठी नेहमीच लढणाऱ्या वकिलांच्या संरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री स्वारस्य घेतील असा विश्वास वकिलांनी या निवेदनात व्यक्त केला आहे .