अंजुमन मध्ये ग्राहक दिनानिमित्त फूड फेस्टिवलचे आयोजन
मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळावे या हेतूने अंजुमन ए इस्लाम या इंग्लिश प्राइमरी आणि हायस्कूल प्रायमरी शाळेच्या वतीने ग्राहक दिनानिमित्त फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले होते. यावेळी शाळेच्या सभागृहात हे फुड स्टॉलचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपण करून आणलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
यामध्ये पिझ्झा बर्गर पाणीपुरी नूडल्स बिर्याणी शोर्मा फेरणी पुरणपोळी कटलेट सॅलेड यासह विविध खाद्यपदार्थ या प्रदर्शनात मांडले होते. यावेळी पालकांनी देखील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या पदार्थांचा आस्वाद घेतला.
तसेस अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष राजू सेठ यांनीदेखील या प्रदर्शनाला भेट देऊन पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच ग्राहक दिनानिमित्त शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे याकरिता हे प्रदर्शन मांडले असल्याचे यावेळी राजू सेठ यांनी सांगितले.