मालमत्तेच्या वादातून घराची तोडफोड
एका मुलाला घरामध्ये कोंडून घराची मागून तोडफोड करण्यात आल्याची घटना ताशिलदार गल्लीत घडली आहे. या घटनेत सावित्री बुगटी या जखमी झालेल्या आहेत त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून आपल्याला जखमी केलेल्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की ताशिलदार गल्ली येथे मालमत्तेच्या वादातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत जखमी झालेल्या सवित्री या कामावर गेल्या होत्या यावेळी त्यांचा मुलगा घरी एकटाच होता यावेळी त्यांच्या घराचा ताबा घेण्यासाठी आल्या दहा ते बारा जणांनी प्रथम दरवाज्याला कुलूप घातला.
त्यानंतर त्यांच्या मुलाचा मोबाईल हुसकून घेऊन त्याला आत मध्ये कोंडले तसेच पाठीमागून घर फोडण्यास सुरुवात केली यावेळी सावित्री दुपारी घरासमोरून जात असताना घराला कुलूप घातल्याचे त्यांनी पाहताच त्यांना संशय आला आणि त्यांनी जाऊन पाहिले असता घर मागून फोडले असल्यास त्यांच्या निदर्शनास आले.
यावेळी त्यांनी संबंधितांना विरोध केला मात्र त्यांना या युवकांनी जखमी केले सध्या त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून आपल्याला मारहाण केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.