कोगनोळी येथे 36 एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाला.. शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान….
कोगनोळी ता. निपाणी येथील भीम नगर नजीकच्या महारकी म्हणून परिचित असलेल्या 848 सर्वे नंबर मधील सुमारे 36 एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना दि. ८ रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली आहे. ही माहिती मिळताच माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्वरित कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी बोलवून उसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. आग हाताबाहेर गेल्याने विजवण्यास अपयश आल्याने सुमारे 36 एकर ऊस हाता तोंडाला आलेला काही क्षणात जळून खाक झाल्याने येथील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावेळी अनेक तरुणांनी देखील आग विझवण्याचे अथोनात प्रयत्न केले. घटनास्थळी कर्नाटक विद्युत बोर्डाचे कर्मचारी संजय खुरपे, अभिषेक सौंदत्ती यांनी भेट देऊन पाहणी केली.