या ग्राम पंचायतीमध्ये होत आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
बीके कंग्राळी येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांकडून उकळले जात आहेत. पैसे दिले तरच कामे करून देण्यात येत आहेत त्यामुळे बीके ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या मागणीचे निवेदन सादर केले आहे.
यावेळी ग्रामस्थांनी पीडीओ यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच येथील पीडीओ पैशाची मोठी मागणी करत आहेत तसेच पैसे दिल्यावरच ते काम करत आहेत. याबरोबरच जर पैसे दिले नाही तर अन्य सदस्यांकडून दबाव आणत आहेत. असा आरोप यावेळी करण्यात आला
ग्रामपंचायतीमध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली तसेच या ठिकाणी कार्यरत असलेले पीडीओ आणि ग्रामपंचायत सदस्यांची खोटी कागदपत्रे बनवून परस्पर दुसऱ्याला आणि कुटुंबाच्या मालकी जागा विकल्या असल्याचे प्रकरण यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी बीके कंग्राळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.