ही सरकारी शाळा घेत आहे उंच भरारी
माजी विद्यार्थी संघटनेच्या देणगीतून सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कंग्राळी बिके उभारण्यात येत आहे. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे विद्यार्थी म्हणून आपण सध्या अनेक ठिकाणी कार्यरत आहोत. याची जाणीव ठेवून सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कंग्राळी बी के ही शाळा उंच भरारी घेत आहे.तेही माजी विद्यार्थी संघटनेच्या देणगीतून.
येथील शाळेच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. काल येथील शाळेच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅब भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दत्ता रामा पाटील नागेश हुद्दार बबन देसाई रामा तारीहाळकर शिवाजी हुरुडे गोपाळ पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन रामा पाटील आणि शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
यानंतर सरस्वती फोटो पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा पुनम पाटील भारता पाटील विना विनोद नांगरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर हिंडाल्को कंपनीचे एच आर विभाग प्रमुख विश्वास शिंदे , व्यवस्थापक महेश शेट्टी आणि उपाध्यक्ष यलोजीराव पाटील यांच्या हस्ते स्लॅबच्या मशीनचे पूजन केले.तसेच स्लॅबचे पूजन माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले त्यानंतर स्लॅब भरणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सदर सरकारी शाळेची इमारत ही तीन मजली होणार असून शाळेमध्ये सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही शाळा माजी विद्यार्थी संघटनेच्या देणगीतून बांधण्यात येत असून शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळा पूर्ण होण्याकरिता भरघोस निधीने मदत करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.