पंत बाळेकुंद्री येथील जवानाचे हृदयविकाराने निधन
पंत बाळेकुंद्री येथील जवानाचे हृदयविकाराने निधन झाले ते जम्मू काश्मीर येथे लष्करी सेवा बजावित होते. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पंत बाळेकुंद्री येथे आणल्यानंतर अनेक राजकीय नेते मंडळींनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्याकरिता मोठी गर्दी केली होती.
मयूर के चंदनशिव वय 42 हे जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा बजावित असताना बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांचे पार्थिव दिल्ली मार्गे गोव्याला आणल्यानंतर गोव्या मार्गे लष्कराच्या वाहनातून त्यांचे पार्थिव पंत बाळेकुंद्री येथे नेण्यात आले.
यावेळी गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप देण्याकरिता मोठी गर्दी केली होती याप्रसंगी अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणा गावकऱ्यांनी दिल्या.
मयूर यांनी आपल्या जीवनातील 23 वर्षे लष्कराला अर्पण केले. त्यांना सुद्धा हवालदार पदी बढती मिळाली होती मात्र अचानक त्यांच्या निधनाने च्या कुटुंबीयांवर गावांवर तसेच भारतीय सैन्यात शोक काळा पसरली आहे.
त्यांचे पार्थीव जेव्हा त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले तेव्हा राजकीय मंडळी तसेच गावकऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.तसेच याप्रसंगी बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुद्धा जवानांच्या कुटुंबीयांना भेट देऊन मयूर यांना श्रद्धांजली वाहिली.