कित्तूर तालुक्यातील राणी शुगर निवडणुकीसाठी एमएलसी चन्नराज हट्टिहोळी पॅनेलचा दमदार शक्तिप्रदर्शन
कित्तूर तालुक्यातील एम.के. हुब्बळी येथील राणी शुगर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी एमएलसी चन्नराज हट्टिहोळी यांच्या पॅनेलकडून आज भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कित्तूर येथील क्रांतीज्योती राणी चेन्नम्मा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला आणि क्रांतिकारक संगोळळी रायन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर समर्थकांसह भव्य मिरवणुकीच्या स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
ही नामनिर्देशन प्रक्रिया निवडणूक अधिकारी प्रभावती फकीरपूर यांच्या समोर पार पडली. या वेळी बाबासाहेब पाटील, प्रमोद कोचेरी, शंकर होळी, सुरेश हुलिकट्टी, शिवनगौड पाटील, फकीरप्पा साक्रेण्णवर, शंकर किल्लेदार, बसनगौड पाटील, मुदकप्पा मरडी, शंकरगौड पाटील, प्रकाशगौड पाटील, महांतश मत्तिकोप्प यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी राणी शुगर निवडणुकीला विशेष राजकीय रंग चढला आहे.