बेळगांव, १७ सप्टेंबर २०२५ : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने “यात्री सेवा दिवस” बेलगावि विमानतळावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी करण्याबरोबरच समाजाशी जुळलेली जबाबदारी अधोरेखित करण्याचा हा दिवस ठरला.
या विशेष दिवशी बेलगावि विमानतळावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विमान वाहतुकीवरील माहिती सत्रे, तसेच फोटो बूथची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांना विमान उड्डाण शाळा, विमान कंपन्या आणि एएआयच्या तज्ज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी देण्यात आली
माननीय खासदार श्री. जगदीश शेट्टर आणि जिल्हाधिकारी श्री. मोहम्मद रोशन यांच्या हस्ते प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली. याशिवाय प्रवाशांचे गुलाबकळी, टिळक व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे पारंपरिक स्वागत करण्यात आले. प्रश्नमंजुषा कार्यक्रम, मोफत आरोग्य तपासणी, तसेच महेश फाउंडेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिर ही उपक्रम देखील घेण्यात आले.
पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यामुळे प्रवासी सेवा, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणीय भान यांचा संगम साधला गेला.
उत्तर कर्नाटकातील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक असलेला बेलगावि विमानतळ सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद आणि जयपूरशी हवाईदृष्ट्या जोडलेला आहे. या भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणारे हे केंद्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसह उच्च प्रतीच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यानिमित्ताने करण्यात आला.