मंगळवार दिनांक 16/9/2025 रोजी मराठी शाळा नं.5 चव्हाट गल्ली येथे कै. ॲड.किसनराव यळळूरकर यांच्या स्मरणार्थ गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच येथील उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री माधव कुंटे सर, ॲड अमर यळळूरकर,शितल यळळूरकर, प्रवीण जाधव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दीपक किल्लेकर, श्रीकांत कडोलकर, रवी नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड श्री अमर यळळूरकर यांनी भूषविले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक श्री मुचंडीकर सर यांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री मुचंडीकर सर यांनी शाळेत विशेष बदल घडवून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष असे परिश्रम घेऊन मुलांना यशस्वी केले असे गौरवोदगार यावेळी मान्यवरांकडून काढण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मुख्याध्यापक मुचंडीकर सर यांनी मुलांची प्रगती आणि शैक्षणिक कार्यासाठी आपण व सर्व स्टाफ सतत काम करू आणि शाळेचा नावलौकीक व पटसंख्या येणाऱ्या काळात नक्कीच उंचावू हा भरवसा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमर यळळूरकर यांनी याप्रसंगी बोलताना मुलांना प्रोत्साहनाची गरज असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साह वाढतो असे सांगितले. तसेच आपण या शाळेच्या साठी कायम पुढाकार घेऊन कार्य करू आणि आपल्या वडिलांचे जे स्वप्न होते की गरजू विदयार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन व शैक्षणिक मदत मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. तसेच शाळा नंबर पाचच्या विद्यार्थ्यांनी आठवी नववी दहावी मध्ये चांगलं यश मिळवलं तर त्यांचाही सन्मान करण्याचं आश्वासन दिल.
तसेच सेंट्रल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री हसबे सर यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन वाढवलं
प्रमुख वक्ते म्हणून बेळगाव येथील उषाताई गोगटे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक माधव कुंटे सर यांनीही कै. किसनराव यळळूरकरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांनी मुलांना चांगला अभ्यास करून स्वतः ची किंमत वाढविण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. खूप अभ्यास करून आपल्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे नावंलौकिक करावा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यानी जिद्दीने व कष्ट घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे आणि आपल्या शाळेचे नाव उंचवावे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुचंडीकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी ए माळी सर यांनी तर आभार श्री पाटील सर यांनी मानले..
Dmedia 24 > Local News > *मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*
*मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण*
Deepak Sutar18/09/2025
posted on
