| Latest Version 9.0.7 |

Local NewsSports News

*अशोकनगरचा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जनतेसाठी खुला*

*अशोकनगरचा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जनतेसाठी खुला*

अशोकनगरचा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव जनतेसाठी खुला; आमदार राजू शेठ यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

बेळगाव :
अशोकनगर येथील महापालिकेचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक साईझ जलतरण तलाव बुधवारी (दि. 17 सप्टेंबर) पासून अधिकृतपणे जनतेसाठी खुला झाला. या तलावाचे उद्घाटन आमदार राजू (आसिफ) शेठ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

या प्रसंगी मंचावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर सौ. वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी, नगरसेवक रियाज अहमद, अमन सेठ, तसेच आबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते, सेक्रेटरी शुभांगी मंगळूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून जलतरण तलावाचे पूजन केले.

आमदार राजू शेठ यांनी आपल्या भाषणात हा तलाव बेळगावच्या जनतेसाठी एक मोठा ठेवा असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. “या ऑलिम्पिक साईझ पूलमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण जलतरणपटूंमधून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापौर मंगेश पवार यांनीही नागरिकांना या तलावाचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले आणि आबा क्लबच्या पुढाकाराचे कौतुक केले. उपमहापौर वाणी जोशी व आयुक्त शुभा बी यांनी शुभेच्छा देऊन हा प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

उद्घाटन सोहळ्यात बेळगावचे नामांकित जलतरणपटू स्मरण मंगळूरकर, वेदांत पाटील, मयुरेश जाधव, निधी मुचंडी, श्रेष्ठ रोटी आणि स्वयं कारेकर यांनी पाण्यात उडी मारून उद्घाटनाला विशेष रंगत आणली. त्यांना आमदार राजू शेठ, आयुक्त शुभा बी आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कुमारी ऋतुजा पवार यांनी झेंडा दाखवून सुरुवात करून दिली.

या कार्यक्रमाला कर्नाटक राज्य अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे सचिव अशोक शिंत्रे, नगरसेवक राजशेखर ढोणी, श्रेयस नाकाडी, तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते. आबा क्लबचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन केले.

बेळगावच्या क्रीडा विश्वासाठी हा पूल एक नवा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.


Deepak Sutar
the authorDeepak Sutar
WhatsApp

Don’t Miss Out! Join Our WhatsApp Group Today!

Get the latest news, updates, and exclusive content delivered straight to your WhatsApp.

Powered By KhushiHost

";