जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धा उत्साहात पार; तनुज सिंग आणि वेदा खानोलकर विजेते ठरले वैयक्तिक चॅम्पियन
बेळगाव :
गोवावेस येथील महापालिका जलतरण तलावात आयोजित जिल्हा पातळीवरील दसरा जलतरण स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. युवजन सेवा क्रीडा विभाग, जिल्हा आडळी व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील जलतरणपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पुरुष गटात तनुज सिंगने चार सुवर्ण पदकांसह वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. तर महिला गटात पाच सुवर्ण पदकांची कमाई करत वेदा खानोलकर हिने वर्चस्व गाजवत वैयक्तिक चॅम्पियनशिप आपल्या नावे केली.
🏊♂️ पदक विजेत्यांची कामगिरी :
पुरुष गट :
तनुज सिंग – ४ सुवर्ण
दर्शन वरूर – ३ सुवर्ण
स्वयं कारेकर – १ सुवर्ण, २ कांस्य
अर्णव किल्लेकर – १ सुवर्ण, १ कांस्य
आदी शिरसाठ – ४ रौप्य
स्मरण मंगळूरकर – ३ रौप्य, १ कांस्य
अभिनव देसाई – २ रौप्य, २ कांस्य
मयुरेश जाधव, प्रजित मयेकर, सिद्धार्थ कुरुंदवाड – प्रत्येकी १ कांस्य
महिला गट :
वेदा खानोलकर – ५ सुवर्ण
श्रेष्ठा रोटी – २ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
निधी मुचंडी – १ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य
मनस्वी मुचंडी – १ सुवर्ण, १ रौप्य
प्रणाली जाधव – ३ रौप्य, १ कांस्य
वैशाली घाटेगस्ती – २ रौप्य, २ कांस्य
ओवी जाधव – २ कांस्य
🏅 पुढील टप्पा :
स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या जलतरणपटूंची निवड बेळगाव विभागीय दसरा जलतरण स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धा १५ सप्टेंबर रोजी अशोकनगर येथील आंतरराष्ट्रीय महापालिका जलतरण तलावात होणार असून सर्व निवड झालेल्या खेळाडूंना सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या यशामध्ये आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक विश्वास पवार यांच्यासह रणजीत पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, कल्लाप्पा पाटील, विजय नाईक, प्रांजल सुळधाळ, शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाट, ज्योती पवार, वैभव खानोलकर, विशाल वेसणे, विजय बोगन, किशोर पाटील, मोहन पत्तार, ओम घाडी यांनी विशेष योगदान दिले.