बेळगाव :
रामनाथ मंगल कार्यालय येथे जय गणेश-श्री 2025 या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्य उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीचे पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून मीहीर अनिल पोतदार यांच्यासह संजय सुंठकर, दयानंद कदम, बसनगौडा पाटील, कृष्णा कुरळे, राघवेंद्र गौत्र पाटील, संभाजी मेलगे, राकेश कळघटगी, नारायण किटवाडकर, बी. प्रकाश, किशोर गवस, उत्तम नाकाडी, सागर काळी, आनंद आपटेकर, महेश सातपुते व रणजीत किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार, राष्ट्रीय पंच अनिल अमरोळे, रणजीत किल्लेकर तसेच जिल्हास्तरीय पंच चेतन ताशिलदार, सुनिल बोकडे, सुनिल चौधरी, भरत बाळेकुंद्री, बाबु पावशे, नागेंद्र मडीवाल, विजय चौगुले, नारायण चौगुले यांनी परीक्षकाची जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन संतोष सुतार, प्रकाश कालकुद्रीकर व श्रीधर बारटक्के यांनी केले तर स्टेज मार्शल म्हणून राजू पाटील, दिपक कित्तूर व सोमनाथ हलगेकर यांनी कार्य केले.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मीहीर अनिल पोतदार यांनी युवकांमध्ये व्यायामाविषयीची आवड निर्माण व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे जिल्ह्यातील शरीर सौष्ठव क्षेत्राला नवे बळ मिळाले आहे. त्यामुळेच बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव व स्पोर्ट्स संघटनेने त्यांची गौरव अध्यक्षपदी निवड करून सन्मान केला.
या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून, जिल्ह्यातील व्यायामप्रेमी तरुणांसाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरली