बेळगाव : उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ यांच्या वतीने युवा नेते अमान शेठ यांनी बसवण कुडची येथील सरकारी शाळेला भेट देऊन नवीन वर्गखोलीच्या बांधकामाचा शुभारंभ केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक वातावरण अधिक सुकर होणार आहे.
या प्रसंगी असिफ (राजू) शेठ फाऊंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमान शेठ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आमदार शेठ यांची दृष्टी ही मतदारसंघातील शासकीय शाळांची सुविधा वाढवणे, दर्जेदार शिक्षण प्रत्येक ग्रामीण व दुर्गम भागात पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सोयी-सुविधा निर्माण करणे अशी आहे.”.
शाळेतील शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली. नवीन वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांची गर्दी कमी होऊन अध्यापनाचा दर्जा उंचावेल, असे त्यांनी नमूद केले.