विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज
बेळगाव:
शनिवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्तींच्या विसर्जनाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे त्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलीस दल आणि जलद कृती दलाच्या जवानांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरफटका मारला.
विसर्जन मिरवणुकीला लवकरात लवकर सुरुवात करून विसर्जन मिरवणूक वेळेत संपवावी त्याचबरोबर विसर्जन मिरवणूक शांततेने व शिस्तीने नेण्यात यावी , असे आवाहन जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महापालिकेने विविध गणेशोत्सव मंडळांना केले आहे. बेळगावमध्ये विविध मंडळाकडून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते.
पहिल्या दिवसापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत अत्यंत भक्तीभावाने उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. कपिलेश्वर मंदिराशेजारी असलेल्या तलावामध्ये श्रीमूर्तींचे उत्साहात आणि भक्ती भावाने विसर्जन करण्यात येते. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो.