आशिया ट्रॉफीचा थरार 9 सप्टेंबरपासून
नवी दिल्ली:
तमाम क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या आशिया ट्रॉफीचा थरार येत्या 9 सप्टेंबर पासून अबुधाबी येथे सुरू होणार आहे. उद्घाटनाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यामध्ये होणार आहे. एकूण आठ टीम यामध्ये सहभागी होणार असून दोन गटांमध्ये प्रत्येकी चार संघ राहणार आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानचा सामना 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता दुबईमध्ये होणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश , श्रीलंका, अफगाणिस्तान, ओमन , हॉंगकॉंग आणि युनायटेड अरब अमीरात अशा आठ टीमचा सहभाग राहणार आहे. 20 दिवस स्पर्धा सुरू राहणार असून अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता दुबईमध्ये होणार आहे. या स्पर्धेमधील सर्व सामने अबुधाबी आणि दुबई येथे होणार आहेत.
भारताचा साखळी फेरीतील पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमीरात विरुद्ध दुबई येथे तर दुसरा सामना 14 रोजी पाकिस्तान विरुद्ध दुबई येथे तिसरा सामना 19 रोजी ओमन बरोबर होणार आहे. भारतीय टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव असून व्हाईस कॅप्टन शुभमन गिल आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे आशिया ट्रॉफीवर वर्चस्व राहिले आहे . त्यामुळे टीम इंडियाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. 14 सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धीमध्ये होणाऱ्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.