भात पिके जोमात
बेळगाव:
यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे भात पिके अत्यंत जोमात आहेत. शिवार हिरवेगार झाले असून बऱ्याच ठिकाणची भात पिके पोसवण्याच्या स्थितीमध्ये आहेत. यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे.
चालू वर्षी सरासरीपेक्षा पाऊस चांगला झाला आहे. पिके चांगली असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शेतामध्ये पाणी आहे. सुगी कामाला अजून अवधी आहे.
भात कापणीनंतर शेतकरी वर्ग रब्बी पिकांची पेरणी करतात. यावर्षी शेतामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे ओलावा बरेच दिवस राहणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी उशिराने होण्याची शक्यता आहे. सध्या भात पिकांमधील रान काढणे आणि अन्य कामांमध्ये शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या तरी पावसाने शेतकरी वर्गाला दिलासा दिल्यामुळे शेतकरी वर्ग खुश असल्याचे दिसत आहे.