गजानन गल्लीतील गणेशोत्सवात महाप्रसाद वितरण सोहळा संपन्न
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गजानन गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजप बेळगाव महानगर जिल्हा उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद व स्थानिक नागरिक, लहान मुले, तरुणाई तसेच वयोवृद्ध मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील रहिवाशांनी आपुलकीच्या वातावरणात महाप्रसादाचा लाभ घेतला. “आमच्यासोबत बालपणी खेळलेली मुले, आमचे संगोपन केलेले ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गणेशभक्तीत सामील होऊन बाप्पाच्या आशीर्वादाची प्राप्ती झाली,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या वेळी श्री गजानन महाराजाच्या चरणी संपूर्ण समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होवो, सर्वांना सुख-शांती, आरोग्य, यश व कीर्ती लाभो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.