काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत युवा नेते अमन सेठ यांचा वाढदिवस साजरा
बेळगाव :
शहरातील काँग्रेस पक्षाच्या युवा पिढीचे प्रेरणास्थान ठरलेले युवा नेते अमन सेठ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेसचे प्रोफेशनल सेल जिल्हाध्यक्ष संदेश राजमाने यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यालयात भेट देऊन अमन सेठ यांचा सत्कार केला.
या वेळी शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. पुढील राजकीय वाटचालीत व जनतेच्या सेवेसाठी त्यांनी अधिक प्रगती करावी, अशा शुभेच्छाही कार्यकर्त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाला शिवानंद गडकरी, निहाल होस्मनी, सचिन गडकरी, सुरेश हुंमळे, सुरेश जाधव आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
अमन सेठ यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या या एकजुटीच्या संदेशामुळे पक्ष संघटन बळकट होत असल्याचे स्पष्ट झाले.