मण्णुर येथे मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिर यशस्वी; पुढील आठवड्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
बेळगाव : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णुर आणि केएलई हॉस्पिटल, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 1 सप्टेंबर रोजी मोफत सर्वसामान्य आरोग्य तपासणी व डोळ्यांची तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 200 हून अधिक लाभार्थ्यांनी तपासणी करून घेतली. तपासणीदरम्यान जवळपास 50 ते 55 नागरिकांमध्ये मोतीबिंदूचा दोष आढळून आला आहे.
विशेष म्हणजे या सर्व रुग्णांवर पुढील आठवड्यात मातोश्री सौहार्द सोसायटी व KLE हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.