पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन
‘जो विद्यार्थी मेहनत घेतो तो आयुष्यात यशस्वी होतो.’ असे उद्गार राऊंड टेबल क्लबचे सदस्य अक्षय ओडूगौडार स्मार्ट टीव्ही पॅनलच्या उद्घाटन समारंभा निमित्त बोलत होते. पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला राऊंड टेबल क्लब कडून 86 इंच स्मार्ट टीव्ही पॅनल देण्यात आला. त्या स्मार्ट टीव्ही पॅनलचे उद्घाटन राऊंड टेबल क्लबचे मेंबर्स अक्षय ओडूगौडार, सागर झनवार, कार्तिक मिस्कीन, आदित्य पारीख, आयुष दालमिया यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाची सुरुवात भाग्यश्री आणि ग्रुप यांनी ईशस्तवन व स्वागत गीताने सुरुवात केली.
त्यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सचिव श्री प्रकाश नंदिहळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर श्री मयूर नागेनहट्टी यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. पाहुण्यांचे स्वागत रोप देऊन प्रकाश नंदिहळी यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर कार्तिक मिस्किन, सागर झनवार आणि आदित्य पारीख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे उपाध्यक्ष नेताजी कटांबळे यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमाला कॉलेजच्या प्राचार्या एम्. एच्. पवार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज हत्तलगे आणि आभार प्रदर्शन रेणुका चलवेटकर यांनी केले.