बेळगाव शाखेला ‘सर्वोत्कृष्ट शाखा’ किताबाचा मान
बेळगांव: 23/08/2025 रोजी चेन्नई येथे पार पडलेल्या दक्षिण भारत प्रादेशिक परिषदेच्या (SIRC) वार्षिक अधिवेशनात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेला “बेस्ट ब्रँच अवॉर्ड 2024” हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या यशामागे माजी अध्यक्ष सीए राजेंद्र मुंदाडा यांचे मार्गदर्शन तसेच सध्याचे अध्यक्ष सीए वीरन्ना मुर्गोड व सचिव सचिन खदबडी यांचे कार्य विशेषत्वाने अधोरेखित झाले. यावेळी समिती सदस्य संजीव देशपांडे, अनिल रामदुर्ग, प्रसाद सोलापूरमठ तसेच माजी अध्यक्ष सीए अशोक मेंशी, सतीश मेहता, राहुल अदके, प्रविण घळी, बी. बी. चंदारगी, माडीवलप्पा तिगडी यांच्यासह सदस्य यासीन देवळापुर व रुशभ शेट्टी आदींची उपस्थिती होती.
दक्षिण भारतातील विविध शाखांमधील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सातत्याने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच व्यावसायिक व सामाजिक योगदानाच्या आधारावर बेळगाव शाखेची निवड करण्यात आली.