बेळगाव तालुका : कंग्राळी बुद्रुक येथे येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवी यात्रेच्या रथनिर्मितीसाठी गावातील तसेच बाहेरील अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत उदार देणग्या दिल्या आहेत.
यात्रा समितीच्या वतीने या देणग्या स्वीकारतांना बुक पूजन व रजिस्टर पूजन सोहळा पार पडला. यावेळी श्री महालक्ष्मी देवीची विशेष पूजा व आरती करून पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
समारंभास यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष जयराम पाटील अध्यक्षस्थानी होते. तर ग्रामपंचायत PDO गोविंदा रंगाप्पगोल व त्यांच्या पत्नी, यल्लाप्पा जाधव, नागेश धामणेकर, तानाजी पाटील, श्रीकांत लमानी, प्रभाकर बेळगावकर, गोपाळ पाटील, तुषार पाटील यांचा समितीच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शंकर कोनेरी यांनी केले.
प्रमुख देणग्या :यल्लाप्पा जाधव – ₹५१,०००,तुषार पाटील (सर्व्हिस मिलिटरी, पहिला पगार) – ₹५१,०००,गोविंदा रंगाप्पगोल – ₹५१,०००,नागराज चिखलकर – ₹२५,०००,नागेश कल्लाप्पा धामणेकर – ₹२५,०००,गोपाळ पाटील, श्रीकांत लमानी, प्रभाकर बेळगावकर – प्रत्येकी ₹११,०००,तानाजी पाटील – ₹५,०००
देवस्थान पंच कमिटी, यात्रा कमिटी तसेच गावकरी यांच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत पवार यांनी केले.