राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या स्केटर तीर्थ पाच्यापूरचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव
बेळगाव :
रोलर स्केटिंग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या स्केटर तीर्थ पाच्यापूर याला जिल्हा प्रशासनाने विशेष सन्मानाने गौरविले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने जिल्हा क्रीडागण येथे झालेल्या प्रमुख कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.
या प्रसंगी तीर्थला प्रतिभा पुरस्कार, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, मोतीहार व म्हैसूर पगडी परिधान करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्केटिंगमधील मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तीर्थ पाच्यापूरने राष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे त्याचा सन्मान हा केवळ व्यक्तिगत नसून संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.