| Latest Version 9.0.7 |

Crime News

*पीडित मुलीच्या सुरक्षेसाठी विश्वकर्मा सेवा संघाचे पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन*

*पीडित मुलीच्या सुरक्षेसाठी विश्वकर्मा सेवा संघाचे पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन*

बेळगाव : बी. के. कंग्राळी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात दाखल केले असले, तरी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना आरोपीच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ व धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर श्री विश्वकर्मा सेवा संघ, बेळगाव यांनी मुलीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली. संघाचे प्रतिनिधी मंडळ आयपीएस अधिकारी बोरसे भूषण गुलाबराव तसेच काकती पोलीस ठाण्याचे सीपीआय सुरेश शिंगी यांना भेटले. संघाने दिलेल्या निवेदनात,आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी,

तसेच पीडितेच्या कुटुंबाला धमकावणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांवरही कारवाई करावी,अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर, उपाध्यक्ष नामदेव लोहार, सचिव वैजनाथ लोहार, शिल्पी अध्यक्ष किरण सुतार, संदीप मंडोळकर, श्रीधर लोहार, दिनेश सुतार, प्रकाश कम्मार, विनायक लोहार, विनायक सुतार यांच्यासह महिला समितीच्या अध्यक्षा गीता लोहार, दिव्याश्री सुतार, रेणुका सुतार, अश्विनी निलजरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.


Deepak Sutar
the authorDeepak Sutar
WhatsApp

Don’t Miss Out! Join Our WhatsApp Group Today!

Get the latest news, updates, and exclusive content delivered straight to your WhatsApp.

Powered By KhushiHost

";