निपाणी, प्रतिनिधी –
अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत निपाणीच्या सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीने तब्बल 26 पदकं पटकावून राज्य व शहराचा मान उंचावला आहे. यामध्ये 7 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्यपदकांचा समावेश असून स्पर्धेत अकॅडमीचा झेंडा अभिमानाने फडकला.
ही स्पर्धा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, भारत सरकार व इंडिया तायक्वांदो यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. स्पर्धेत सब-ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर आणि सीनियर विभाग तसेच फाईट व पुमसे या प्रकारांमध्ये सामने झाले.
स्पर्धेत रुही बोधले, ब्रींदा कुबसद, दिया तीप्पे, पूर्वा साळुंखे, सोनल लगाडे, नंदिनी सुतार, अदिती मातीवड, पुष्पा पाटील, अपूर्वा पवार, लावण्या सावंत, अनुष्का चव्हाण, सानिध्य भिवसे, सौम्या खोत, अवनी व्हदडी, अफ्राह पठाण, शुब्रा अक्की, समयरा पठाण, स्नेहल मगदूम, तनवी धनानंद आणि आरुषी बोधले या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी विविध पदकं जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.
तर तनया वाळवे, मृण्मयी रावण व निधी साठे यांनी अंतिम फेरी गाठत कौशल्याची छाप पाडली.
यशस्वी खेळाडूंना श्री समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्रणलिंग स्वामीजी तसेच निपाणी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
अकॅडमीचे यश हे प्रशिक्षक बबन निर्मले, नंदन जाधव, देवदत्त मल्लाडे, प्रथमेश भोसले, आदित्य सोलापूरे व गणेश हुलकंती, ओमकार अलखनुरे यांच्या कसोशीच्या प्रशिक्षणाचे फळ असल्याचे मानले जाते.