बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज शुभारंभ,
बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज शुभारंभ,सलग चार दिवस रंगारंग कार्यक्रम
बेळगाव – श्री माता सोसायटीचे चेअरमन श्री मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून बेळगावात श्री गणेश फेस्टिवल आयोजन केले जात आहे.बेळगावात गेली 24 वर्ष सुरू असलेल्या आणि बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचे यावर्षी ही 19 ते 22 ओगष्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.गुडशेड रोड येथील श्री माता सभागृहात सलग चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सोहळयाच्या अंतिम दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा नवरत्न सन्मानाने सत्कार करण्यात येणार आहे.
आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट पासून विनायक बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाने यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवलला सुरुवात होत आहे. दुसऱ्या दिवशी दिनांक 20 ऑगस्ट रोजी महिलांच्या वरीच्या (तांदूळ) गोड आणि तिखट पदार्थांच्या पाककला स्पर्धा होणार आहेत. गणेश फेस्टिवल च्या तिसऱ्या दिवशी दिनांक 21 ऑगस्ट रोजी,अभिजीत कालेकर (खानापूर) प्रस्तुत ‘जागर लोक संस्कृतीचा’ कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 22 ऑगस्ट ला नवरत्न सन्मान सोहळ्याने यावर्षीच्या गणेश फेस्टिवलची सांगता होणार आहे.
नवरत्न सन्माना अंतर्गतयावर्षी संतोष दरेकर(समाजसेवक), मीरा तारळेकर (साहित्यरत्न), वैभव लोकूर (नाट्यभूषण),सीमा कुलकर्णी (संगीतरत्न),सतिश लाड (उद्योगरत्न), आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्ती प्रशिक्षक राम पवार (क्रीडा रत्न), अनिता राऊत(श्रमसेवा),आशा रत्न (कृषिरत्न) व सामाजिक संस्थेचा सन्मान दुर्गवीर या गडकोटांचे रक्षण आणि संवर्धन करणाऱ्या संस्थेला ला बहाल करण्यात येणार आहे. बेळगावच्या रसिकांनी आणि गणेश भक्तांनी गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.