७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन : स्केटिंग रॅलीतून देशभक्तीचा उत्साह
बेळगाव प्रतिनिधी :
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये सुमारे ४० स्केटर्सनी भाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तुकाराम पाटील, सोहम हिंडलगेकर यांच्यासह पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅली कॉपोरेशन स्केटिंग रिंक येथे पार पडली. ३ वर्षे वयाच्या चिमुकल्यांपासून ते २५ वर्षे वयोगटातील स्केटर्सनी हातात तिरंगा घेऊन सलग ७९ मिनिटे स्केटिंग करत “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “हर घर तिरंगा”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
या रॅलीमध्ये सौरभ साळोखे, अनघा जोशी, प्रसन्न वाणी, ऋषीकेश पसारे, सुकन्या कुपाणी, पंकज कुपाणी, ऋत्विक दुबाशी, आशिष अंगडीकर, सिद्धार्थ पाटील, प्रीतम बागेवाडी, शल्य तरळेकर, गर्व लोहार, देवांश जाधव, लावण्या भंडारे, दिव्या भंडारे, सत्यम पाटील, गगन जैन, पृथ्वीराज एन. डी., धनुष आचार, रीवा नाईक, प्राणिका मोटेकर यांच्यासह अनेक स्केटर्सनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमातून बालकांपासून तरुणांपर्यंत सर्वांमध्ये देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान जागृत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.