बिजगर्णी गावात युवकांचा स्तुत्य स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील तरुणांनी सामाजिक जाणीव आणि बांधिलकीचा आदर्श ठेवत गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला. पावसाळ्याच्या काळात गवत, झाडे-झुडपे वाढल्याने आणि कचरा साचल्याने नागरिकांना अंत्यविधीच्या वेळी अडचणी निर्माण होत होत्या.
या परिस्थितीवर उपाय म्हणून ब्रम्हालिंग युवक मंडळ, तिरंगा युवक मंडळ, श्री गणेश भांडी संघ आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडू, फावडे, खोरे, खुरपे यांसारख्या साधनांचा वापर करून परिसरातील गवत व कचरा हटवण्यात आला. https://youtube.com/shorts/RLgVDNnICFQ?si=fh8W8fZBNB6ziGVJ
कोणतेही आर्थिक लाभ न पाहता केवळ सामाजिक जबाबदारीतून राबविलेला हा उपक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या मोहिमेत अनेक ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा उपक्रमांमुळे गावाचे सौंदर्य वाढते, स्वच्छता टिकते आणि गावपण जपले जाते. या मोहिमेत मनोहर बेळगावकर, निंगाप्पा जाधव, बबन जाधव, संतोष कांबळे, मनोहर पाटील, परशरम जाधव, रमेश भाषकलं, सागर नाईक, यल्लाप्पा तारिहालकर, रामचंद्र मोरे, अप्पाजी निलजकार, सुनील बचिकार, मोहन सावी, दयानंद बिर्जे, राजू जाधव, गोपाळ बेळगावकर, अशोक तारिहालकर, भाऊ जाधव, विनोद खांडेकर, चेतन अष्टेकर, सागर जाधव यांसह अनेकजण सहभागी झाले होते.