फुटबॉल स्पर्धेत संत मीरा विजेता,जी जी चिटणीस उपविजेता.
बेळगांव ता 12.टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर गोमटेश विद्यापीठ स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेला नमवित विजेतेपद पटकाविले.
पहिल्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने गोमटेश विद्यापीठ शाळेचा 2-0 असा पराभव केला. विजयी संघाच्या सोमेश्वर व केदारलिंग संभाजीचेने गोल केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने केएलएस शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर 3-1 असा पराभव केला. विजय संघाच्या अब्दुल मुल्ला, अनिरुद्ध हलगेकर ,अथर्व गावडे यांनी गोल केले तर पराभूत संघातर्फे प्रेमने एकमेव 1 गोल केला
तर अंतिम लढतील संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा अटीतटीच्या लढतीत 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले आता संत मीरा संघ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
सकाळी स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे गोमटेश स्कूल मजगांवचे मुख्याध्यापक महातेश हिरेमठ प्रशासक प्रदीप पाटील, बापू ,दयानंद बजंत्री, उमेश मजुकर चंद्रकांत पाटील,कौशीक पाटील,यश पाटील शिवकुमार सुतार,किरण तरळेकर जयसिंग धनाजी, संतोष दळवी , या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.