१२ पदकांची कमाई – आर्मी पब्लिक स्कूल, मराठा LIRC बेलगावीचा सीबीएसई दक्षिण झोनल-II ज्युडो स्पर्धेत जलवा
बेळगाव : महाराष्ट्रातील शिर्डी येथे ४ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान झालेल्या सीबीएसई दक्षिण झोनल-II ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये आर्मी पब्लिक स्कूल, द मराठा LIRC बेलगावीच्या खेळाडूंनी दणदणीत कामगिरी करत १२ पदकांची कमाई केली असून, ६ खेळाडूंनी सीबीएसई नॅशनल्ससाठी (श्रीगंगानगर, राजस्थान) पात्रता मिळवली आहे.
पदक विजेते
रौप्य पदक: आर्या मुचंडी, समर्थ माने, अनुष्का भोसले, त्रुप्ती बस्तवडकर, अभिमन्यु गुरव, श्रेया वसूलकर
कांस्य पदक: पृथ्वीराज महाडिक, सावनकुमार हादपद, अभय लक्कुंडी, आयुष पवार, कार्तिक श्रीरंगशेट्टी, जिक्र बिष्टि
या उल्लेखनीय यशामागे मुख्याध्यापिका सौ. रुपिंदर कौर चहल यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सौ. रेखा अक्षय जांगले यांचे कठोर प्रशिक्षण लाभले.
शाळा व्यवस्थापनाने पदकविजेत्यांचा सत्कार करून त्यांच्या चिकाटी, कौशल्य आणि खेळाडूवृत्तीचे कौतुक केले. या विजयामुळे शाळा तसेच शहराचा लौकिक आणखी उंचावला आहे.