बेळगावच्या भाग्यश्री पोल यांना “बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025”
बेळगांव – सौंदर्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत बेळगावचे नाव देश व राज्यभर गाजवणाऱ्या मेकअप आर्टिस्ट भाग्यश्री पोल यांना प्रतिष्ठित “बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड 2025”ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डी एस आर इंडिया आयोजित भव्य कार्यक्रमात, ३० जुलै २०२५ रोजी, मुंबईतील ताज महल पॅलेस हॉटेल येथे प्रदान करण्यात आला.
या विशेष सोहळ्यात इराणमधील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट कॅट्टो यांच्या हस्ते भाग्यश्री पोल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक वर्षांपासून बेळगावमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री पोल यांनी आपल्या कौशल्य, नवनवीन प्रयोग आणि ग्राहकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या यशामुळे बेळगावकरांचा अभिमान दुणावला असून, स्थानिक तसेच राज्यातील सौंदर्य क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांसाठी त्या प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.