आंबोली मॅरेथॉनमध्ये बेळगावच्या डॉल्फिन ग्रुपचा उत्साहपूर्ण सहभाग
आंबोली : आंबोली येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या डॉल्फिन ग्रुपने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. जवळपास 30 सभासदांनी 7 किमी अंतराच्या शर्यतीत भाग घेऊन हा मॅरेथॉन यशस्वी केला.
या मॅरेथॉनचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉल्फिन ग्रुपचे सभासद गजानन शिंदे, अध्यक्ष महादेव केसरकर, अरुण जाधव, मुकेश शिंदे, प्रशांत कांबळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
डॉल्फिन ग्रुपच्या सदस्यांनी स्पर्धेदरम्यान उत्तम धावशैली आणि टीमवर्कचे प्रदर्शन करत उपस्थितांचा उत्साह वाढवला. फिटनेस आणि आरोग्य जनजागृतीसाठी अशा उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवण्याची परंपरा डॉल्फिन ग्रुपने कायम ठेवली आहे.