फोनिक्स पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन दिनी वृक्षारोपण
बेळगाव : होनगा (बेळगावी) येथील फोनिक्स पब्लिक स्कूलच्या परिसरात रक्षाबंधनाच्या पर्वावर दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सी.आय.जे.डब्ल्यू. आयटीबीपी हिमवीर हलभावी कॅम्पचे १०० जवान, शाळेचे चेअरमन विवेक वी. पाटील, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि संपूर्ण शिक्षकवर्ग यांच्या सहभागातून आंबा, जांभुळ, बदाम, गुलमोहर, पेरू आणि पिंपळ अशी एक हजार रोपे लावण्यात आली.
या वृक्षारोपण मोहिमेचा उद्देश दूषित झालेले पाणी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवणे, हवामान शांत राखणे, पक्षी व प्राण्यांसाठी आसरा व अन्न उपलब्ध करणे, औषधी झाडे वाढवणे आणि मृदा धूप रोखणे हा आहे. स्वच्छ पर्यावरणामुळे निरोगी जीवनशैली आणि चांगले आरोग्य मिळते, याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी ९ हजार रोपे लावण्याची जबाबदारी सी.आय.जे.डब्ल्यू. आयटीबीपीला सोपविण्यात आली असून, ग्रामसभा, शाळा/महाविद्यालये आणि काकती वनविभाग यांच्या सहकार्याने आतापर्यंत ६ हजार रोपे लावण्यात यश आले आहे. फोनिक्स स्कूलमधील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयटीबीपीचे अधीनस्थ अधिकारी जयकिशन बंसल यांनी विशेष भूमिका बजावली.