पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
‘असे नाव करा की तुमचे काम होईल आणि असे काम करा की तुमचे नाव होईल’ असे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी विचार मांडले. विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने सुकृती लोहार हिने केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी दिपप्रज्वलन केले. नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री प्रकाश नंदिहळी यांनी केले. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्या एम. एच. पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून व स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जय भारत फाउंडेशनचे संचालक श्री दयानंद कदम यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन व सांस्कृतिक, खेळ व इलेक्शन लिटरसी क्लब 2025-26 चे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावर्षातील कॉलेजमधील मंत्रिमंडळांला मानवंदना देऊन डॉ. स्मिता मुतगेकर यांनी मंत्रिमंडळाला शपथ देऊ केली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले, त्यावेळी ते असे म्हणाले की, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, क्रियाशील व महत्त्वकांक्षा या गोष्टी आपल्या जीवनाला यशस्वी बनवतात. त्याचबरोबर मनाला भावनेने, रागाला प्रेमाने आणि माणसाला माणुसकीने जिंकता येते असेही त्यांनी सांगितले, शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपसचिव श्री एस. एम. साखळकर यांनी अध्यक्षीय समारोप करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला अस्मिता क्रिएशनचे प्रोडूसर राजेश लोहार, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर नागेनटी व आभार डॉ. स्मिता मुदगेकर यांनी केले.
Dmedia 24 > Education News > *पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत*
*पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत*
Deepak Sutar11/08/2025
posted on
