कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत राखी प्रदर्शन
कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेने रक्षाबंधनाचे औचित्य साधून शाळेत राखी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी दरवर्षी हे प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या ऑडिटर मॅरिलीन कोरिया, शाळेचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यामध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ग्राहक म्हणून शाळेच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध रंगाच्या राख्या तयार करून विक्री करण्याचा आनंद लुटला. त्यांना शाळेतील शिक्षक व पालकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.