बेळगावजवळ बसचा अपघात : स्टेरिंग लॉक झाल्यामुळे झाडाला धडक, दहा जखमी
बसचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे बस झाडाला धडकून दहा प्रवासी जखमी झाले.बेळगाव जवळील बेळगुंदी गावाजवळ ही घटना घडली. बेळगुंदी येथून बस बेळगावला येत असताना हा अपघात घडला. बसचे स्टेरिंग लॉक झाल्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस झाडाला जावून धडकली. बसमधून पंचवीस पेक्षा अधिक प्रवास करत होते. https://youtube.com/shorts/beMu0TyDLB0?si=viL3SdUKMtN-SvVx
बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचे प्रवाशांना समजताच प्रवाशांनी घाबरून आरडा ओरडा केला. बस झाडाला धडकल्यावर प्रवासी आपल्या आसना वरून उडून खाली पडले. अपघातात झाल्याचे कळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लगेच पोलिसांनी रुग्णवाहीका बोलवून पोलिसांनी जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.