सेंट पॉल्स हायस्कूलने क्रोनोस 2023″ या ९व्या आवृत्तीचा उपक्रम सुरु केला असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली .क्रोनोस ही एक ग्रीक देवता असून शब्दश: अर्थ ‘to strike’ म्हणजे अविरत प्रयत्न असा आहे असे सांगितले .
सेंट पॉल्स हायस्कूलची १६७ वर्षांची ही परंपरा आहे, आणि तीच आम्ही पुढेही सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्रोनोस हा अतिशय उत्तम आंतर शालेय उपक्रम असून दरवर्षी सेंट पॉल हायस्कूल चे कॅबिनेट याचे आयोजन करीत असते अशी माहिती शाळेने दिली .
शाळेच्या वतीने आत्तापर्यंत आठ वेळा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि आठही वेळा अतिशय उत्साहाने यशस्वी झाला आहे. मध्यंतरी कोविड महामारी मुळे यात खंड पडला होता पण आता पुन्हा एकदा आम्ही हा उपक्रम आयोजित करून परंपरा पुढे चालविण्याचे ठरविले आहे. असे सांगितले
क्रोनोस 2019 मध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थी आणि 25 शाळा कर्नाटका सह गोवा व महाराष्ट्र मधून सहभागी झाल्या होत्या. त्यावेळेस संगीत आणि साहित्य हा विषय हाताळला गेला होता. सर्वांना त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल अतिशय आनंद झाला होता. मानकरी त्यावेळेस के एल एस या शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते तर उपविजेते पदाचे डिवाइन प्रॉव्हिडन्स हायस्कूल शाळा झाली होती. अशी माहिती दिली
यावेळेस “वैश्विक चिंतन्याच्या पलीकडे” हा विषय या उपक्रमासाठी निवडण्यात आलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत जे काही नवीन शोध लागले आहेत त्यांच्याही पलीकडे जाऊन अतिशय अभिनव कल्पना आहे . याचा निरंतर ध्यास घेऊन सर्वांना त्यांचातील सूक्त गुणांना वाव देऊन आपली प्रतिभा जागृत करण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत शालेय शिक्षकांनी दिली .