५ नंबर शाळेच्या विद्यार्थ्यांचे मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत घवघवीत यश
बेळगांव: अहमदनगर येथील मंथन वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्येड घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत जवळ गल्ली येथील पाच नंबर मराठी शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहेत.
कुमार शुभम गौरव हुलोळी इयत्ता आठवी, कुमार समर्थ कलखाबंकर इयत्ता सहावी, कुमार शिवम सुभाष राजगोळकर इयत्ता आठवी,कुमारी राशी विनायक पाटील इयत्ता पाचवी, कुमारी स्वरा शटूप्पा हुदलिकर इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांना सेंट्रल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वजीत हसबे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र विज बोर्ड निवृत्त अधिकारी श्रीकांत कडोलकर आणि शाळेची मुख्याध्यापक पी.के.मुचंडीकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तर परीक्षेची फी आणि पुस्तकांसाठी माझी प्राचार्य डॉ एम.एम.जाधव यांनी रोटरी मिडटाऊन आर्थिक सहाय्य मिळवून दिले.या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.