होमगार्ड कर्मचाऱ्यांचे 4 दिवसीय प्रशिक्षण संपन्न
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात यावा या दृष्टिकोनातून होमगार्ड यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या चार दिवसाच्या प्रशिक्षणात होमगार्ड कर्मचाऱ्यांना विविध ट्रेनिंग देऊन त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सज्ज ठेवण्यात आले आहे.
येथील एपीएमसी के एस आर पी ट्रेनिंग सेंटर मध्ये या ट्रेनिंग ची सुरुवात 28 मार्च रोजी करण्यात आली .
त्यानंतर सलग चार दिवस होमगार्ड कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर आज 31 मार्च रोजी या चार दिवशीय प्रशिक्षणाची म्हणजेच ट्रेनिंगची सांगता करण्यात आली.
सदर ट्रेनिग होमगार्ड कमांडंट किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच के एस आर पी कमांडंट रमेश बोरगावी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
तसेच के एस आर पी ट्रेनर रियाज मुनोळी होमगार्ड इंटेक्स्टर राकेश गुनाळ ,रवी कोळी अथणी, आय एस गाळीमठ खानापूर ,आर.सी परूशेट्टी, कडली यमकनमर्डी ट्रेनिंग यशस्वी करण्यात यांचे सहकार्य मोलाचे लाभले.