छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक दिन गुरुवार दि. ६ जून २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येणार आहे तरी सर्व शहापूर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवभक्तांनी सकाळी ठीक ९ वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित राहावे असे आवाहन शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव सचिव श्रीकांत कदम यांनी कळविले आहे.