*दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कला स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली*
मराठी विद्यानिकेतन येथे 28 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बहिर्जी ओऊळकर ‘आर्टिस्ट ऑफ द इयर 2025’ स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलमधील विद्यार्थीनी आराध्या रेडेकर आणि साक्षी पुजारी यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक पारितोषिक आणि उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले.
या दोन्ही विद्यार्थीनींचे शालेय एस्.एम्.सी.कमिटीचे चेअरमन निवृत्त प्राचार्य आर.के.पाटील,व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर.एस्.पाटील, सेक्रेटरी प्रोफेसर नितीन घोरपडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी यशाबद्दल अभिनंदन केले! सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना पुढील यश मिळवण्यासाठी प्रेरणा मिळेल, हिच सदिच्छा!