**शहर पोलीस आयुक्तांनी गुंडांना दिला कडक इशारा: “रमजानात शांतता राखा, नाहीतर कडक कारवाई!”**
शुक्रवार : रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात आज राऊडी परेड घेण्यात आली. ‘काळ्या यादीतील’ गुंडांना बोलावून सक्त ताकीद देण्यात आली. या परेड दरम्यान पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुंडांना सणाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
तसेच सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे संदेश पाठवून शांतताभंग करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील असेही पोलीस आयुक्तानी सांगितले. गुन्हेगारीचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्तींनी आपले वर्तन सुधारून एक जबाबदार नागरिक बनावे असे आवाहन पोलीस आयुक्तानी काळ्या यादीतील गुन्हेगारांना केले.